आमच्या बिल्डींग चे रिपेरिंग चे काम सुरु आहे ..त्या साठी घराच्या सेफ्टी साठी लावलेल्या ग्रील काढून ठेवल्या आहेत .. घर बंद करून जाता येत नाही कारण घर सर्व बाजूने उघडे राहते ..शिवाय बिल्डींग ला बाहेरून लावलेल्या बांबूच्या पराती मुळे कोणालाही सहज घरात प्रवेश करता येईल अशी स्थिती आहे ..अचानक परवा काही कामा निमित्त बाहेर जाणे गरजेचे होते,,निघताना लक्षात आले कि आपला सोन्याचे दागिने असलेला लाकडी डबा घरात आहे आणि घराला सेफ्टी नाही .. कपाट लाकडी असल्याने ते सहज उघडता येणे शक्य होते ..शिवाय तो डबा बरोबर घेवून जाण्यात हि काही अर्थ नव्हता .. आता पंचाईत होती .. घरात सेफ जागा शोधून हि सापडेना .. अनेक पर्याय चेक केले जसे बेड च्या आत, फ्रीज मध्ये, ड्रोवर मध्ये वगैरे पण काही मन पसंद जागा सापडेना ..अखेर एक जागा दिसली.. वॉशिंग मशीन .. तिथे चोरालाच काय त्याच्या बापालाही संशय येणार नाही ... लगेच डबा वॉशिंग मशीन मध्ये ठेवला , वरून ७/८ कपडे टाकले आणि निर्धास्त पणे निघून गेलो .. यायला संध्याकाळ झाली ..आलो तेव्हा अर्धांगिनी कामावरून आली होती ... नेहमीप्रमाणे वॉशिंग मशीन काहीही तक्रार न करता बिनदिक्कत फिरत होती ..सर्व कामे व्यवस्थित सुरु होती.. जेव्हा कपडे वळत घालण्याची वेळ आली तेव्हा माझ्या नावाने एक स्फोट झाला ... अरे हे काय ? हा डबा इथे कसा आला .... आणि मला ब्रम्हांड आठवले ... मेलो .. आई चा घो... अर्रर .. विसरलो विसरलो... आत डबा लपवून ठेवला होता .. अरे वॉशिंग मशीन मध्ये कोण सोने लपवून ठेवते का ? ( सगळ्या शिव्या मी लिहित नाही ..हे सगळे उच्च स्वरात )..ड्रेनेज मध्ये गेले असेल ना.... करायला गेलो एक आणि झाले भलतेच ... डबा बाहेर काढला तेव्हा तो स्वच्छ दिसत होता .. प्री वॉश - मेन वॉश - रीन्झ - ड्राय असे सर्व सोपस्कार त्यावर झाले होते .. तो बराच घट्ट लावला होता म्हणून उघडला गेला नव्हता ..पण आत मध्ये पाणी आणि साबण गेला होता .. सर्व कागद म्हणजे पावत्यांचा सत्यानाश झाला होता आणि सोने मस्त लकाकत होते ... घराण्याच्या सर्व स्तरातून शिव्या खाल्ल्या ...असो .