Wednesday, December 26, 2012
।।वारी ....
सर्व शिक्षण संपवून ..Reckitt & Colman या multinational कंपनी मध्ये नोकरी ला लागलो होतो मी तेव्हा.. तिथे post , salary सर्व उत्तम होते. अचानक घबाड मिळावे अशी नोकरी आपसूक माझ्या हातात पडली होती विशेष प्रयत्न न करता. ६ महिने probation आणि नंतर permanent होणार होतो .. पहिले ६ महिने मात्र खूप काम असे .. सतत targets साठी meetings असत ऑफिस मध्ये .. attend करण्या करिता खूप धावपळ होत असे .. सकाळी ट्रेन पकडून Ballard Pear ला जावे लागे .. आपल्या मुळे मीटिंग लेट होऊ नये याची प्रयत्न पूर्वक काळजी घ्यावी लागे .. पण तरीही थोडाफार उशीर हा गृहीत धरलेला असे .. राहणीमान हि अगदी multinationals ना साजेसे असावे लागे.
ज्याला up -to -date म्हणतात असे .. कडक इस्त्रीचे कपडे .. टाय .. black shoes .. खिशाला गॉगल .. पार्कर चे पेन .. हातात ऑफिस ची bag .. कमरेला पेजर .. असा एकंदर अवतार असे माझा तेव्हा .. स्वभावात अभिनय , दमदार आवाज आणि अभ्यास या मुळे माझी सर्व presentations नेहमीच कौतुकाचा विषय असत ..
सोमवारीच मिटिंग लागली होती .. घरून निघायला आज जरा उशीर झाला होता .. नेहमीची ट्रेन निघून गेली होती .. आता अंधेरी ला उतरून फास्ट ट्रेन पकडायला लागणार होती .. मानसिक तयारी केली होती त्याची .. गोरेगाव ला स्लो ट्रेन पकडली आणि माझा विचार बदलला .. म्हटले अंधेरी वरून फास्ट ट्रेन पकडून चर्च गेट ला न जाता सरळ V T ची हार्बर पकडली आणि VT ला गेलो तर लवकर पोहोचेन शिवाय चालायला हि कमी लागेल .. विचार पक्का केला .. एकदा पेजर चेक केला .. अजून कोणताही मेसेज आला नव्हता ऑफिस मधून ..
अंधेरी ला उतरलो आणि एक नंबर platform च्या पलीकडे असलेल्या ६ नंबर platform वर नजर टाकली तर एक हार्बर अगदी निघण्याच्या तयारीत होती .. हि गाडी मिळाली कि मग काही टेन्शन नाही ..पण एव्हड्या गर्दीतून पूल चढून जाणे म्हणजे दिव्य होते.. आजूबाजूला पहिले तर अनेक लोक track cross करून जात होते.. मी हि सरळ track मध्ये उतरलो .. १ no platform वर आधी हातातली bag ठेवली आणि मी वर उडी मारणार इतक्यात समोरून एक हात माझ्या मदतीला आला .. मी हि लगेच तो हात पकडला आणि वर चढलो .. thanks म्हटले पण तो माणूस हात सोडेचना ..
अरे क्या ?..
आओ साब .. चौकी मे चलते है ..
कहा ..
round up शुरू है .. रेल्वे लाईन क्रॉस करने वालोंको पकड रहे है ।
हे बोलत असताना त्याने झडप घालून दुसर्या हाताने एका कामाठ्याला हि पकडले .. आडदांड असा तो आणि त्याच्या दोन हातात आम्ही दोघे ..
लाज लाज लाज लाज लाज लाज आणि निव्वळ लाज .
कामाठी आणि मी एकाच रांगेत आलो याची लाज
सर्व लोक पाहत होते याची लाज
मुलीही पाहत होत्या याची लाज
अनेक प्रकारे त्याला समजावण्याचा प्रयत्न केला .. पैसे देतो म्हंटले पण तो काही ऐकेना ..
लेके कहा जा राहे हो ?
जेल मे ...
क्या ?????????
हा .. थोडी देर बैठो वहा ...
क्या ?????????
चिल्ला क्यो राहे हो .. कोर्ट ११ बजे खुलेगा ..तब बोलना जो भी केहना है वो ..
मै मुझे जेल नही जाना .. मै बाहर बैठता हु.. आप बोलो न कितना पैसा चाहिये .. मेरी मिटींग है .. नयी नौकरी है .. निकाल देंगे मुझे नौकरी से ..
( खिशात १२०० रुपये होते) ..
तुम लोगोंको छोडा तो मुझे भी निकाल देंगे नौकरी से ..
हे सर्व पाहून कामाठी ला हि चेव आला .. हमेशा तो छोडते हो साब पैसा लेके .. १५०० देता हू .. जाने दो साब .. काम पे जाना है ..
आयला याच्या कडे माझ्या पेक्षा जास्त पैसे .. कामाठ्याला टाय लावला असता तर तो माझ्या सारखाच दिसला असता बहुदा .. असो ..
पोलिसाने आधी त्या कामाठ्याला आणि नंतर मला lock up मध्ये टाकले ..
मरण यातना झाल्या पहिल्यांदा आत पाऊल टाकताना .. आयुष्यात पहिल्यांदा .. कोंदट वातावरण .. असंख्य गुन्हेगार .. बेवडे, जुगारी , आणि मी ..
काय केले मी हे .. एव्हडा मोठा माणूस मी .. खिशाला पेजर बिजर .. गळ्यात टाय, हातात bag आणि lock up मध्ये .. आता पुढे सगळा अंधार .. ऑफिस मध्ये विचारतील उशीर का झाला मग काय सांगणार ?.. पेजर वर मेसेज येईल आता बॉस चा कि फोन कर .. मग फोन कसा करणार? नोकरी जाणार आपली .. शी .. काहीतरी केले पाहिजेच .. मी अगदी दाराला खेटून उभा होतो .. कामाठी आत मध्ये जाऊन आरामात बसला होता ..माझ्या कडे पाहून एकदा हसलाही .. ११ वाजेपर्यंत आपली सुटका नाही हे त्याने गृहीत धरले होते.. मला मात्र चैन पडेना.. घुसमट होऊ लागली .. १० मिनिटे गेली असतील आणि अचानक दार उघडून एक पोलिस आत आला .. आत बसलेल्या अनेकांपैकी त्याने दोन जणांना सोबत घेतले आणि जाऊ लागला .. मी लगेच त्याच्या कडे गेलो .. माझ्याच वयाचा होता ..मराठी होता .. काहीपण कर पण मला बाहेर काढ इथून ..
का पकडलाय ?
लाईन क्रोस केली म्हणून ..
काय सांगताय.. आणि आत मध्ये टाकलेय ? कधी ? कोणी ?
कोणी ते माहित नाही ,, साध्या वेशातला पोलिस होता कोणीतरी..
थांबा बघतो मी .. नाव काय तुमचे ?
शशांक सावंत
सावंत का ? गाव् वालेच आहात तुम्ही .. कुठले गाव ?
च्यायला आता हा गाव बिव का विचारतोय ? पण नाईलाज होता .. मी म्हटले कणकवली
वा .. मी कोल्हापूरचा .. बघतो बोलून ..
आणखीन ५ मिनिटे अशीच गेली ..
आणि मग एक दुसराच पोलिस आत आला
शशांक सावंत कोण .. या साहेब बोलावतायत ..
मी लगेच बाहेर गेलो ..
बाहेरची हवा वेगळीच होती अशी जाणीव झाली .. या हवेत मला उलटे लटकवले असते तरी चालले असते पण ते lock up नको ..
१०० रुपये द्या ..
१०० ??
परत आत जायचेय ? .
नाही साहेब .. कामावर जायचेय .. देतो १०० रुपये .. लगेच १०० रुपये काढून दिले ..
साहेब आतमध्ये एक कामाठी आहे ..तो पण पैसे देईन म्हणतोय.. त्याला हि कामावर जायचेय .. जमल्यास सोडा त्याला हि ..
बघतो .. जा तुम्ही ..
मी बाहेर आलो .. गेली १५ मिनिटे आयुष्यातून काढून टाकली आपण असे स्वताला अनेकदा समजावले.. पेजर वर बॉस चा मेसेज अजून हि आला नव्हता
सरळ ऑफिस ला फोन लावला .. म्हटले sorry boss .. i ll be coming late today .. I was put in to jail for crossing the railway line ..
boss: jail ? dont tell this to any one ..where r u now ?
Andheri Station ..
ok .. dont come today to office .. meeting is cancelled .. you go to your field .. tomorrow come in time .
Thank you boss, Hv a good day .
वाईट वेळ निघून गेली होती ..
आता सरळ फिल्ड वर जावे म्हणून वळलो तर समोर कामाठी उभा होता ..
thank you साब..साले सब चोर है .. आप thumps up पियेंगे ..
नही भाई काम पे जाना है।
Monday, December 17, 2012
आमचे उद्योग - धंदे .
Saturday, December 1, 2012
अनुभवाचे बोल ...
प्रत्येक माणूस हा कोणाची न कोणाची कॉपी करतो .. प्रत्येक गोष्टीत .. बोलताना , वागताना, जगताना , निर्णय घेताना ... सर्व गोष्टीत ऐकलेले वाचलेले पाहिलेले असे त्याला आठवते आणि तो तसा त्या परिस्थितीला सामोरा जातो . फार काही सिरिअस लिहित नाहीय कारण मुळात मी त्या टाईप चा माणूस नाही . बड़ी बड़ी मुश्किलोंको चुनौतियोंको आसान करके जिया हु मै आजतक ..
आज लिहितोय ते अशाच एका माझ्या प्रकरणाबद्दल .. माझ्या म्हणजे
आमच्या कॉलेज मधल्या सामुहिक कॉपी बद्दल .
गोड मला खायला आवडत असले तरी अभ्यासात फार गोडी नव्हतीच कधी .. पास होण्यापुरत आमचा अभ्यास ..त्यात हि मित्रांचे सहकार्य असायचेच . हातात उत्तर पत्रिका घेवून काहीही आठवत नसल्याच्या अवस्थेत बसलेले असताना supervisor ने येवून cover your answer sheet म्हटले कि मला जाम हसायला यायचे . बहुतेक विद्यार्थी अशाच कॉप्या करून पास होतात असा आमचा ठाम विश्वास होता . आणि असा विश्वास कॉलेज प्रशासनाचाही होता त्यामुळे अनेक मुले पकडली जायची . मुलीही काही कमी नव्हत्या . पण त्या जरा रडायला लागल्या कि सुटायच्या पण मुले मात्र अडकायची .. आय कार्ड काडून बिडून घेतले जायचे .. मी थोडा निर्धास्त असायचो या बाबतीत कारण नाटकात कामे करत असल्याने सर्व स्टाफ ओळखायचा .. तंबी देवून सोडायचा .. असो .. नाटकाचा असाही फायदा .. ( शिवाय प्रिन्सिपल च्या मुलीला बहिण मानले असल्याने सुटण्यास मदत व्हायची ' वडिलांची ' )
एव्हडे सगळे असले तरी त्या वयात रिस्क घेतली नाही तर मग काय मज्जा .. परीक्षा जवळ आली कि कोणता पोर्शन ऑप्शन ला टाकायचा याचा विचार आम्ही करायचो तसेच कोणता पोर्शन कॉपी करायचा हे हि ठरवायचो . प्रत्येकाचा कॉपी करण्याचा पोर्शन आणि मार्ग निराळा .. नवनवीन पद्धतीने कॉपी करण्याची खलबते केली जायची कोलेज कॅन्टीन मध्ये ..मुलीही सामील असायच्या .. गुप्तता पाळली जायची उत्स्फुर्तपणे ..
एका वर्षी कहर झाला .. महत्वाच्या परीक्षेच्या पेपर च्या आधी नाटकाचे शो असल्याने अभ्यास करायला तसेच आजूबाजूच्या मित्रांबरोबर कॉपी प्लान करायला वेळच मिळाला नाही .. विषय क्लीअर होणे गरजेचे होते नाहीतर ए टी के टी .. आता स्वताच काहीतरी करणे गरजेचे होते .. रात्री १० वाजता अभ्यासाला बसलो .. next day morning ८ चा पेपर होता .. विषय मोठा होता .. ११ वाजता लक्षात आले कि आपल्या लक्षात काहीही राहत नाहीय .. उगाच झोपायचा वेळ फुकट जातोय .. मग माझ्या पुढे बसणाऱ्या स्मिता सावर्डेकर ला फोन केला.. काय तयारी झालीय न ? मला काहीही येत नाहीय .. तुझाच सहारा आहे .. मदत कर मला गरज लागली तर .. मी हि वाचतोय थोडेफार वगैरे बोलणे झाले पण तिचा मूड काही ठीक वाटेना .. धड बोलली हि नाही .. दिसायला बरी नसल्याने आम्ही तिच्या कडे इतर दिवशी फार पाहत नसायचो याचा राग असावा बहुदा तिला ..हो करेन कि मदत पण मलाही फार काही येत नाहीय असेकाहीतरी जुजबीच बोलली ..
काही सुचत नव्हते.. सर्वत्र अंधार झाल्याचा भास होत होता .. शेवटचा उपाय म्हणून मग काय ट रा ट रा पुस्तक फाडले. हवे होते ते सर्व पेपर फोल्ड केले ..साधारण ३० पाने .. १५ पाने शर्टात उजव्या बाजूला आणि पंधरा डाव्या बाजूला ठेवायची असे ठरवले .. चला झाला अभ्यास .. आता निवांत झोपूया असे ठरवून उठलो आणि एक विचित्र समस्या लक्षात आली .. ५० पानाच्या पुस्तकातली ३० पाने माझ्या शर्टात असणार हे जरी खरे असले तरी कोणत्या पानावर काय आहे हे ऐन वेळेला कसे कळणार . सर्व पाने एका वेळी बाहेर काढली तर गेलोच १२ च्या भावात ..खूप विचार केला .. पास होणे गरजेचे होते ..आणि मग या आत्यंतिक गरजेतून एक शक्कल सुचली .. ऐन वेळेला असे काही सुचण्या करिता हि बुद्धी लागते ..शक्कल थोडी घातक आणि साहसी होती पण जर उद्या कामी आली तर समस्त कॉपी बहाद्दरांतर्फे माझा सत्काराच होईल असे मला वाटू लागले .. अभिमान वाटला स्वताच्या अक्कल हुशारीचा . लगेच त्या सर्व पानांना १ ते ३० नंबर दिले ..पुढल्या अर्ध्या तासात सर्व पानांवर जे महत्वाचे topic होते त्याची index बनवली . index बनवण्या करिता वापरलेला पेपर हि उत्तर पत्रिकेचा होता ..त्याच साईज चा .. व्यवस्थित उत्तर लिहावे अशी लिहिली होती index .. जेणेकरून supervisor ला संशय येणार नाही आणि त्याला वाटेल कि ते एक उत्तर पत्रीकेचेच पान आहे . आता सर्व अभ्यास झाला होता . मग निवांत झोपलो लाईट बंद करून .
सकाळी जरा लवकरच पोहोचलो कॉलेज मध्ये ..अनेक मुले आपापल्या ' हत्यारांसह ' आली होती . एकमेकांशी सूचक सांकेतिक भाषेत बोलत होती . मी हि सामील झालो त्यात . फार काही टेन्शन नव्हते मला .. थोड्याच वेळात क्लास मध्ये गेलो .. जाऊन पाहतो तो काय स्मिता सावर्डेकर चा बेंच एका क्लासरूम मध्ये शेवटचा आणि माझा शेजारील क्लासरूम मध्ये पहिला .. आईचा घो पहिला बेंच म्हणजे लागली वात .. पायाखालची जमीन हलल्याचा भास झाला .. वाटले स्मिता चा बेंच उचलून इथे आणावा पण समोर बोर्ड वर ठळक पणे लिहिलेले नंबर दिसले आणि तो प्लान सोडून दिला . आता जे होईल ते भगवान भरोसे .
केमिस्ट्री चा अत्यंत खत्रूड प्रोफेसर मोहनदास आमच्या वर्गावर आला आणि माझ्या सर्व आशा संपल्या . आल्याआल्या त्याने माझ्याकडे पाहून एक कुत्सित स्माईल हि केले . काळा ढेरपोट्या केसाला मोगरा तेल लावलेला डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा आणि गेंड्याची चाल हे त्याचे वर्णन . उत्तर पत्रिकांचे वाटप झाले .. अजून १० मिनिट्स होती प्रश्न पत्रिका मिळायला .. मी माझी सर्व हत्यारे एकदा हात लावून चेक केली सर्व आपापल्या जागी नीट होती . प्रश्न होता तो फ़क़्त index चा . शर्टातील index पेपर काढून मिळालेल्या उत्तर पत्रिकेत सरकवला पण .. पण तो उत्तर पत्रिकेच्या बाहेर येवू लागला कारण स्टेपलर पिन मुले तो पूर्ण आत जाईना .. एक भीतीची लहर माझ्या शरीरातून गेली जेव्हा माझ्या समोर मोहनदास येवून उभा राहिला .. अगदी त्याच्या पोटाखाली माझी उत्तर पत्रिका होती आणि त्यातून बाहेर आलेली माझी Index .. त्याने नुसते खाली पहिले असते तरी मी फेल .. असा बाका प्रसंग होता . माझ्या आजूबाजूच्या सहकलाकारांच्या हि गोष्ट लक्षात आली होतीच .. ते हि माझ्याकडे सहानभूतीपूर्वक पाहत होते .. आणि अचानक idea सुचली .. मी तिथेच माझ्या उत्तर पत्रिकेची स्टेपलर पिन काढून टाकली व index पेपर आत नीट घुसवला .. आता तो बाहेरून दिसत नव्हता .. मान वर केली आणि अदबीने म्हटले " सर स्टेपलर प्लीज ".. मोहनदास टेबलावरील स्टेपलर घेवून आला .. मी लगेच उठून उभा राहिलो .. दोन हातात दोन टोकाला उत्तर पत्रिका ताणून धरली त्याच्या समोर.. तो त्या मध्ये दोन स्टेपलर पिन मारून निघून गेला.. मी हसून जोरात म्हटले ' Thank you sir " . आजूबाजूने हलका हसण्याचा आवाज आला .. मी अवार्ड विनर च्या अविर्भावात सपा सप पेपर लिहिला .. अगदी मुद्देसूद उत्तरे ..पुस्तकातल्या सारखी हुबेहूब ..फारच सोप्पा होता पेपर .. उत्तर पत्रिका परत देताना index पेपर काढायला अजिबात विसरलो नाही .. मोहनदास ला पुन्हा एकदा Thank you म्हटले .. आणि मग कालांतराने मी त्या विषयात पास हि झालो भरपूर मार्काने .
Subscribe to:
Posts (Atom)


