Monday, December 31, 2007

जिंकू किंवा मरु


अभिजीतचा निरोप आला. विचारत होता २००७ ने काय दिले? क्षणभर थबकलो. मागे वळून पाहिले अणि आठवणीचा कल्लोळ उडाला. रोजच नवीन दिवस. सूर्य उगवतो, सूर्य मावळतो. जुने सरते नवे येते. जाता जाता खूप काही देउन जाते. बघता बघता वर्ष गेले. कमालीचे अनुभव देवून गेले. अनेक छान स्मृती मागे ठेवून गेले. एक आठवण मात्र अजून डोळ्यासमोरून जात नाही. २००७ मे महीना, वेळ संध्याकाळची. ऐन गर्दीची. नेहमीप्रमाणे ' तू हलतोयस का मी तुझ्यापुढे जाऊ? असा एक्मेकाशी हाँर्नच्या भाषेंत संवाद करणारी चार आणि दुचाकीवरच्या योद्ध्यांची गर्दी . आणि त्या गर्दीमध्ये मला २००७चा मोलाचा क्षण मिळाला. त्यामध्ये, त्या पुण्याच्या जगप्रसिद्ध ट्रैफिक मध्ये तो मला दिसला . गर्दीच्या मध्यभागी. हिरीरीने जाणारा. १८-१९ वर्षाचा . काळा सावळा. उन्हाने रापलेला, घामाने भिजलेला. त्याच्याकडे झुण्डीशी सामना करणारा वेग होता . पण आपल्या सायकलवर त्याचे नियंत्रण कमालीचे होते. मागच्या क्यारीएर वर लावलेले सामान सांभाळ्त कोठेही धक्का न लागता नेमकेपणाने तो पुढे जात होता. डाव्या हातात काठी, दूसरा हात हँन्डलवर, उजव्या पायडलवर एक पाय आणि हातातल्या काठीच्या टोकाखाली एक खिळा जो नेमकेपणाने डाव्या पायडलमध्ये गुंतवलेला. त्याला एकच पाय होता. मी पहातच रहिलो. पुण्यात धडधाकट माणसाला रस्त्यावर यायचे म्हणजे छातीत धड्की भरते. हा जिगरबाज मुलगा या भयाला भिडला होता. त्याच्या नजरेत होती विजेत्याची चमक. हा एखाद्या जेत्याच्या अविर्भावात आपलें आयुष्य जगत होता२००७ ने मला या 'अजिंक्य मुलाच्या' रुपाने सकारात्मक दृष्टिकोन, आणि मूर्तिमंत जिद्द दाखवली. हा मोलाचा क्षण माझ्या मनात कायमचा कोरला गेला. थैंक्स २००७.

Thursday, December 6, 2007

कभी कभी...



कभी
कभी मेरे दिलमे ख़याल आता है ॥


के जिंदगी तेरी जुल्फोंकी नर्म छावो मे गुजर ना पाती तो शादाब हो भी सकती थी...

ये रंग जो गम कि स्याही, जो दिलपे छाई है तुम्हारे नजरोंकी शबाबोंमे खो भी सकती थी...

मगर
ये हो न सका ..

मगर ये हो न सका और अब ये आलम है के तू नही तेरा गम तेरी जुस्तजू भी नही॥


गुजर रही है कुछ इस तरह जिंदगी जैसे इसे किसीके सहारे कि आरजू भी नही॥


न कोई राह, न मंजिल, न रोशनी का सुराग !


भटक रही है अन्धेरोंमे जिन्दगी मेरी...इन्ही अन्धेरोंमे रह जाऊंगा कभी खोकर

मैं जनता हू मेरी हम नफाज़...मगर युही


कभी कभी मेरे दिलमे ख़याल आता है..

अबे..पिच्चर अभी ख़त्म नही हुई ..वो साइड वाला लिंक्स भी पढ़..

Tuesday, November 27, 2007

KD..आता फ़क़्त आठवण ..



हल्लीच एका नाटकात एक वाक्य ऐकले "आठवणीना हि एक expiry date असते " . खरय काळाच्या ओघात आठवणी हि पुसट होत जातात .. बऱ्या.. वाईट . ..घरात गेलेल्यांचे फोटो टांगून त्यांच्या आठवणी ताज्या ठेवण्याचा प्रकार त्यामुळेच सुरु झाला असावा .
.

त्याचा फोटो नाहीय माझ्याकडे पण आठवण अजून ताजी आहे . आज हि त्याची आठवण आली कि डोळे पाणावतात . त्याच्या बरोबर घालवलेला सर्व काळ डोळ्यासमोर उभा राहतो . अशी काही माणसे भेटतात कि ज्यांच्याशी आपला कधीच संबंध आलेला नसतो , पण जेव्हा येतो तेव्हा तो कायम टिकतो .. आणि एक दिवस अचानक ती माणसे तुम्हाला सोडून जातात .. परत न येण्या साठी ..
..


''कमलाकांत केळुस्कर ' आमच्या साठी K. D.

हा माणूस आमच्यातून निघून गेला त्याला ६ वर्षे होऊन गेली . खरतर माझे लग्नही झालेले नव्हते तेव्हा त्याला तीन मुले होती , एवढा आमच्यात वयाचा फरक होता . पण तो कधीच जाणवला नाही .

आम्ही एकाच कंपनी त काम करायचो . माझ्या सर्व समवयस्क मित्रांमध्ये KD अगदी फिट बसला होता . अनेक चुकीच्या गोष्टी तो जाणूनबुजून सतत करायचा पण करू नको म्हटल्यावर ऐकेल तो KD नव्हेच .. अगदी कंपनी ने दिलेली working bag कामाचा कंटाळा आला म्हणून त्याने सर्व समक्ष कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली होती .. नंतर आम्हीच ती बाहेर काढून घेतली एका भिकाऱ्या कडून .. असा तो . Union leader असल्याने त्याच्या नावाचा तसा दबदबा असे आणि आम्ही सर्व तें त्याचे शागीर्द . कालांतराने आमच्या union मध्ये union president ची जागा रिकामी झाली आणि त्या जागी माझी नेमणूक झाली ..हे सारे KD च्या आग्रहा खातर ..मला तर union च्या कामातले काही काळात हि नव्हते पण KD ने सॉलिड confidence दिला ..Union च्या मिटींग्स च्या निमित्ताने माझे KD च्या घरी येणे जाणे सुरु झाले . त्यांची मुले त्याची बायको यांच्याशी हि ओळख झाली . स्वताच्या घरी हि KD तसाच होता जसा बाहेर ..प्रेमळ .


हळू हळू माझे KD च्या घरी जाणे हे मला मी माझ्या घरी असल्यागत वाटू लागले होते . आमच्या ऑफिस ची सर्व खलबते त्याच्या घरीच घडत असत . माझे बाकी सर्व मित्रही असत . एक आपुलकीचे नाते निर्माण झाले होते . union मिटींग्स च्या संदर्भात अनेकदा कलकत्ता येथे जावे लागे . KD अगदी मनापासून माझी काळजी घेत असे त्या अनोळखी शहरात. दारू पिताना मात्र तो मला म्हणे कि ' उगाच तुला प्रेसिडेंट बनवले .. कंपनी दारू देते आणि तू पीत नाहीस..सगळी फुकट जाते '. त्याची आणखी एक मजेदार आठवण म्हणजे जेव्हा जगात गणपती दूध पीत होते अशी अफवा उठली तेव्हा आम्ही कलकत्त्यात होतो. मिटिंग मध्ये असताना अचानक एक बंगाली धावत आला व ओरडला " गणेश ठाकूर दूध खोबे " .. मिटिंग तत्काळ बंद करवून चमत्कार पाहायला बाहेर धावणारा पहिला माणूस KD होता. आम्ही हि धावलो .. एका देवळा बाहेर प्रचंड रंग लागली होती ..आत जाणे शक्य नव्हते . KD ने आईडिया केली .. खिशातून एक छोटा कॅमेरा काढला व जोरात ओरडू लागला " प्रेस प्रेस .... प्रेस फ्रॉम मुंबई .. हट जाव हट जाव " २/३ फ्लाशेस उडवले ..आणि चमत्कार घडला ..त्या सर्व बंगाली नि KD ला पुढे जाऊ दिले .. त्याच्या मागे अर्थात मी . बाहेर येवून आम्ही पोट धरून हसलो होतो.

KD खूप दारू प्यायचा ..जी मिळेल ती प्यायचा पण अतिशय control मध्ये असायचा ..मी हि अनेकदा त्याला त्या विषयी बोललो पण no hopes .. शिवाय त्याच्या इतर गुणांकडे पाहता मग या गोष्टींकडे आम्ही हि डोळेझाक करायचो . .

त्याच्या मुलांसाठी मी शशांक दादा होतो तर त्याच्या बायकोला मी वहिनी म्हणायचो . वहिनी हि एक अत्यंत प्रेमळ बाई होती . KD च्या अनेक चुका तिने आजवर माफ केल्या होत्या . त्याचे दारू पिणे , स्मोकिंग हे तिलाही मान्य नवते पण सांगून उपयोग नव्हताच ..कारण तो KD होता . 'तू एकदा समजाव त्याला तू त्याच्या जवळचा आहेस न ' मला सांगे पण अखेर उपयोग होत नसे .. मग मी तरी किती वेळा सांगणार . KD चा मित्र परिवार अफाट होता . दिवसात कोणत्याही वेळी ट्रेन ने जाताना त्याला ट्रेन मध्ये एकतरी ओळखीचा माणूस भेटायचाच आणि KD ला तो त्याच्या सर्व family history सह माहित असायचा .. एखादे काम अडले तर आम्ही सरळ KD कडे धाव घ्यायचो आणि त्याच्या कडे त्याचे solution असायचे . अनेक लोकांना तो out of the way जाऊन मदत करायचा . माझे नाटकात काम करणे हे माझ्या घरच्यांना कधीच आवडले नाही पण KD family ला त्याचे फार कौतुक होते . इतरान पेक्षा माझ्यावर त्याचे पूर्ण घर जरा जास्तच प्रेम करे . माझ्या लग्नात ऑफिस ला दांडी मारून पत्रिका वाटत माझ्या बरोबर फिरला होता ..वाहिनी तर जाम खुश होती ..अगदी तिच्या घरचेच लग्न होते न ..



लग्नाच्या काही महिने आधी मी job बदलला तेव्हा KD रडला होता ..त्या एवढ्या मोठ्या माणसाला समजावताना मग माझ्या नाकीनऊ आले होते . ज्या दिवशी मी job सोडला त्या रात्री समुद्र किनार्यावर बसून तो एकटाच दारू प्यायला होता ..आणि हे हि मला नंतर KD नेच सांगितले .




आता आमचे भेटणे कमी झाले असले तरी फोन वर बोलणे सुरु असे . "आता कंपनीत मजा नाही रे " असे सतत सांगायचा आणि परत बोलवायचा .. पण एकदा कंपनी सोडून गेलेल्या Union President ला private कंपन्या परत घेत नसतात . त्याच्या घरी कधी कधी वहिनी फोन वर यायची म्हणायची कि ' कंपनी सोडल्या पासून तुझे प्रेम आट्लेय. हल्ली येत नाहीस . मुले , KD सतत आठवण काढतात . ये वेळ काढून ' मीही मग एक दिवस यायचे आश्वासन द्यायचो पण आता नवीन कंपनीत कामाची वेगळी पद्धत असल्याने वेळ मिळायचा नाही ..


लग्ना नंतर हळू हळू भेटणे तर दूरच पण फोन करणे हि कमी झाले . KD ने हि कंपनी सोडली मध्यंतरी च्या काळात , आता तो full fledge LIC agency करायचा . कधी फोन केला तर घरी हि भेटायचा नाही . वहिनीशी, मुलांशी जुजबी बोलणे होत असे .. आमच्यातली मैत्री कमी झाली होती असे नाही पण अनेक वर्षे एकत्र काढल्याने असेल किंवा आमच्यात नवीन काही संवाद घडत नसल्याने असेल .. एक अनामिक दुरावा मात्र जाणवू लागला होता .. दरम्यानच्या काळात KD चे दारू पिणे वाढले होते म्हणे ..


*********

***********

*************

****************

एका दुपारी एका मित्राचा फोन आला "Bad news.. अरे आपला KD गेला ". मी गप्प आहे हे पाहून तोच पुढे म्हणाला "काल रात्री दारू पिऊन bike चालवताना पडला आणि त्याचा हात fracture झाला होता .. DR म्हणाले उद्या सकाळी bandadge करू .. आता admitt व्हा व झोपा.. वहिनींना म्हणाले तुम्ही जा आता आणि सकाळी या साहेबाना चहा घेवून .. वाहिनी सकाळी ८ वाजता चहा घेवून गेल्या तेव्हा हा DR बरोबर गप्पा मारत होता .. सर्वांचा चहा झाल्यावर DR ने वहिनींना bandadge साठी लागणाऱ्या सामानाची लिस्ट दिली व खाली chemist कडे पाठवले ..

वहिनी समान घेवून आल्या तेव्हा KD गेला होता ... siviour heart attack '




मी अजून हि गप्पच होतो . ' तू coroner court मध्ये ये , मी हि पोहोचतोय '.


मी coroner court मध्ये पोहोचलो तेव्हा काही अनोळखी माणसे तिथे उभी होती ..मी आत वाकून पाहिले ... एवढा शांत KD आज पहिल्यांदा पाहत होतो .. वाटले शक्य च नाही . .आता हा माणूस उठणार आणि म्हणणार चुतीया बनवले तुम्हाला ...काश ..

जमलेल्या लोकांसमोर शो नको म्हणून तिथेच एका बाजूला गपचूप उभा राहिलो .. रडलोच नाही ..

काही च तासात सर्व सोपोस्कार आटोपले आणि आमचा KD काळाच्या पडद्या आड आणि भिंतीवरल्या फोटोत निघून गेला .

त्या दिवशी KD च्या घरा बाहेर उभा राहून मी वहिनींना रडताना ऐकत होतो .. घरात खूप गर्दी होती .. माझी मात्र त्यांच्या समोर जायची हिम्मत होत नव्हती .. त्या वेळी मी त्यांच्या समोर गेलो नाहीय तो आजतागायत .

मी जायला हवे होते . नंतर मी कधी फोन हि केला नाही .. कधीच .. आठवणी चा वहिनींना त्रास होईल अशी स्वता :चीच समजूत घालत बसलो ..

अजून दिवसभरात एकदातरी मला KD आठवतोच . त्याच्या bike सारखी bike कुठे दिसली तरी KD चा भास होतो . त्याच्या सारखी दिसणारी माणसे हि कुठे न कुठे दिसतात आणि पुन्हा सर्व आठवते .. पूर्ण casett rewind होते ....

मी त्या कुटुंबाला निदान moral support द्यायला हवा होता आणि या न त्या कारणाने मी तो देणे टाळले .. ती हि माझी एक जबाबदारी होती याचा मी कधी विचार केला नाही आणि हि सल आयुष्यभर राहणार .. आज देवाच्या दयेने त्यांचे उत्तम चालले आहे .. पण मी मात्र वाईट वागलो ..

KD I AM SORRY यार..

Thursday, November 22, 2007

MI ANI TE DOGHE..


अचानक ते दोघे दिसले आणि मी घाबरलोच . डोळ्यांवरून सकाळची झोप पूर्ण गेली नसल्याने किंवा दृष्टी भ्रमाने ते दिसले असावेत असे वाटले , पण अर्ध्या तासाने चहा वगैरे घेवून झाल्यावार पुन्हा पहिले मी आरशात तरीही ते तिथेच होते . ते 2 पांढरे केस . पांढरे केस म्हणजे अनुभव , काळ्या दगडांवरील सफेद रेघ .., केस उन्हात नाहीत पांढरे झालेत वगैरे असंबद्ध वाक्प्रचार मनात गोंधळ घालू लागले . पण आरशातल्या त्या चेहऱ्यावर मात्र वेगळाच गोंधळ दिसत होता .. आजवर स्वताला लहान समजणारा मी ..अनेक गोष्टीत घरातील मोठ्या माणसांवर विसंबून राहणारा मी ..भविष्याची विशेष फिकीर न करणारा मी ..आयुष्यात कोणतीही डेरिंग करायला सतत पुढे असणारा मी ..आरश्यात हादरलेला दिसत होता ..हे 2 पांढरे केस मला माझ्या म्हातारपणाचा जणू ट्रेलर दाखवत होते . आजवरच्या आपल्या सर्व समजुतीनं तडा देत म्हातारपण जवळ येत असते आणि आपण काळाच्या या रेटया पुढे हतबल असतो . य 2 पांढऱ्या केसांनी माझ्या जबाबदार्या अचानक वाढवल्या . मी वयाने मोठा झालोय हे मनाने नाही तर काळाने दाखवायला सुरुवात केली होती . आजवर आपण काय कमावले काय गमावले हे एकदा पाहावे मागे वळून असे मनात आले . आपल्या पेक्षा ज्यांचे केस अधिक पांढरे झाले आहेत त्यांची काळजी घेणे किती गरजेचे आहे ..मनात येवून गेले . भविष्यातील जबाबदार्या , आजारपण , शौक या सर्वांसाठी आताच तरतूद करायला हवी .
आता या पुढे रिस्क हि calculated घ्यावी लागणार .. 1 न 2 कितीतरी गोष्टी . या 2 केसांनी अचानक समोर आणून उभ्या केल्या . .
साला हे 2 पांढरे केस पटदिशी उपटून टाकले तर ..या कानाचे त्या कानाला कळणार हि नाही ..अजून एक विचार ..निर्धार पक्का झाला ..आजूबाजूला पहिले ..आपल्याला कोणी पाहत नाहीय न ?..नाहीतर नेमके कोणीतरी म्हणजे लहान भाऊ वगैरे टपकायचा आणि खिल्ली उडवायचा माझ्या पांढऱ्या केसांची .. शी .. माझे पांढरे
केस ...आता उपटून टाकल्यावर कसले राहतायत माझे म्हणा ...
कुणीही नाही आजूबाजूला याची खात्री पटल्यावर मी हातात फ्लीकेर घेतला ..आणि काळ्या केसांमधून वाट काढत मोठ्या कष्टाने त्या 2 म्हातार्यां पर्यंत पोहोचलो ..त्या दोघांना एकाच वेळी त्या फ्लीकेर मध्ये पकडले .. आता फ़क़्त 1 च झटका आणि मी माझ्या पूर्वावस्थेत ..
पूर्वावस्था ...अ ..अ ...म्हणजे मी काल होतो तसा ..कि ..कि ..त्याही पूर्वी मी जसा होतो तसा ..कि ..मी वयाने हि लहान होणार ..कि ..कि ..शी ..
माझे काहीतरी चुकताय असे वाटून गेले ..
पांढरे केस म्हणजे आयुष्यातल्या बर्या वैताची पावती ? विचारांची प्रगल्भता ? आता फ़क़्त बापाचे रोल मिळणार ? टक्कल असण्या पेक्षा पांढरे केस बरे .. मेहेंदी लावली कि कळणार हि नाही ..असे एकेक केस उपटत राहिलो तर एक दिवस टक्कल नक्की .. अरे बापरे .. भयंकर विचार .. सर्व पांढरे केस वाले असाच विचार करत असतील ?..
प्रकृती अनेक मार्गाने , कळत नकळत अनेक गोष्टी सांगत शिकवत असते ना . . मग असे घाबरून जावून कसे चालणार ?..अजून विचार .. बदल हा तर निसर्ग नियम आहे . आज जे काही आहे ते सर्व उद्या नसणार , निर्मिलेले सर्व उद्या नष्ट होणार .. मग त्यापासून किती दूर पळणार आणि कधी पर्यंत ? जे आहे ते जसेच्या तसे स्वीकारले तर? .. कवी वसंत आबाजी डहाके म्हणतात "सरते शेवटी काय तर आपल्याला जुळवून घ्यावाच लागते .. सभोवतालच्या काळाशी "
शेवटा पर्यंत न थांबता आताच जुळवून घेतले तर शेवटी कमी त्रास होईल .. स्वताची फसवणूक कशी करणार? नाही का ...
डोक्यातले वादळ हळू हळू शमत होते , आरश्यातील चेहरा आता मी ओळखू शकत होतो , फ्लिकर बाजूला झाला होता .
आता मी या 2 म्हातारया ना जपणार . .त्यांचे आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करणार .. येणाऱ्या सर्व पांढरया केसांना सन्मानाने मिरवणार .. म्हातारपणाला विशेष भविष्यकाळ नसतो .. पण या केसांचा वर्तमान चांगला करणार .. असे अनेक विचार करत असतानाच मागून मुलीची हक ऐकू आली .. बाबा ए बाबा .. भविष्य काळाची सकाळ झाली होती .नकळत हात केसांवरून फिरला आणि ते 2 पांढरे केस काळ्या केसात आनंदाने लुप्त झाले..

हो भारत माझा देश आहे


ते पाकिस्तानी राष्ट्र अराजकता वादी राष्ट्र म्हणून ख्याती प्राप्त आहे . भारतात आतंक पसरवण्याचे काम ते सतत करत असतात .. ते कितीही नाही म्हणाले तरी हे सत्य आहे . झिया -उल -हक
, बेनझीर भुत्तो , नवाज शरीफ किव्वा परवेज मुशर्रफ असोत .. या सर्व नेत्यांनी नेहमीच भारता विरोधी कारवाया आणि भाषणे केली आहेत . पाकिस्तान चे PTV ta भारत विरोधी प्रसार करण्यासाठी च वाहिलेले आहे . पाकिस्तानी नेते सतत 2/3 तास भारता विरुद्ध भाषणे देत असतात आणि भारताच्या policies कशा चुकीच्या आहेत हे आपल्या लोकांच्या मनावर बिंबवत असतात . आपण मात्र भाषण करताना minority च्या भावनांचा विचार करतो .. अर्थात गरजणारे बरसणार नाहीत असे आमचे नेते सांगत असले तरी या गर्जना 1 अनामिक भीती उत्पन्न करतात ..याचा संबंध मग भारतीय कर -दाते कारगिल , संसदे वरील हल्ला , मुंबई bomb blast , विमान अपहरण , मुंबई वरील दहशतवादी हल्ला या सगळ्या शी लावू लागतो .

आपण परंपरा संस्कृती जपतोय ..अजून पर्यंत देश च्या सीमेवर धिंगाणा घालणाऱ्या दुष्मनाला तिथेच नामोहरम करण्या ऐवजी आपण तो आपल्या घराची बेल कधी वाजवतोय याची वाट पाहत बसलो होतो . संसद भावना वरील हल्ला , मुंबई वरील हल्ला म्हणजे कहर झाला .

मित्रानो आपणच चुकतोय ..हो ..नाहीतर काय हिम्मत होती या देशाची जो भारताच्या मेहेरबानी वर स्वतंत्र झाला त्याची भारता कडे मान वर करून पाहण्याची ..अरे भारत हा 1 मोठा लोकशाही असलेला देश आहे ..हजारोंच्या संखेने आम्ही नेते निवडून दले आहेत ..मग ?

देश सांभाळ न्या साठी ज्यांना नेते बनवले ते जर फ़क़्त खुर्ची सांभाळण्यासाठी आणि आपले bank balance करोडोंच्या घरात नेण्यासाठी धडपडणार असतील तर उद्या हेच पाकिस्तानी तुमच्या घरात राहायला येतील . आपल्याच देशात फिरताना लागणारे सुरक्षा रक्षकांचे कोंडले या आमच्या नेत्यांनी सीमेवर धाडले आणि केलेल्या घोत्याल्या मधील करोडोंची रक्कम सरकारजमा केली तरच या देशाचे भले होईल ..

प्रश्न हा उरतो कि मी काय करू शकतो ?..

मी पुढील election ला त्या वेळी चांगल्या वाटण्यार्या माणसाला निवडून आणू शकतो ..आणि म्हणू शकतो भारत माझा देश आहे सारे भारतीय ...

Wednesday, November 21, 2007

MANN


AAAmche mann mothe ahe, Mannat aanle tar kahihi karta yeil, Mannachya gabharyat dukkh datale ahe, Mann halave zale hote.. ashi anek mannashi khel karnari vakye aapan sarras vaparat asto.
Ya mannashi aapla javalcha sambandh aslya ne aapan tyala vaparat asto.. nivval vaparto. Aaplya manache hi tyala kadhich kahi objection naste.
Ya mannala changlya - vaitachi janiv nasavi bahuda.. karan jya manat bhutdaya, daandharm, karuna, sraddha ya sarkhya goshti yetat tyach mannat bhandantante, khun, choryamarya vagaire vait goshtihi yetyat.
Mala vatate ki ya mannala mannch nasave nahitar ase zalech nasate nahi ka ?
Baherchya paristithi shi ya manna cha javalcha sambandh asto.. pan sarv goshti mannasarkhya hotatch asehi nahi..
Don kappe aslela he mann barya vaitachi jaan thevat asave bahuda nahitar aaplyala dvidha manastithi cha pratyay ka yava? Aani ho he mann fasave hi aste .. mannat ek aste ani jibhevar dusarech. Ya goshti samaorchya mansachya lakshat yetat tevha ya manna cha prachand tiraskaar hi hoto.
Mannat nastana jevha kahi goshti karavya lagatat tevha vait vatate ya mannala.
Mannala samudra chi upama devu ka? Bagha na te kadhi kadhi shaant aste tar kadi kadhi .. mhanje sunder mulagi vagaire disli samor ki bharati yavi samudrala tasha usalya ghevu laagte. Annyay hotana disala tar vaadal uthave samudrat tase te band karun uthate.. Vaadalat gave chya gaave uddvastha zaleli aikivaat ahet.
Bandakhor mann kay karil te shabdaat saangne kathin ahe. Engrajanchya hatatun satta kabij karun deshala swatantra karnaari manne hi ashich bandakhor hoti mhane..
Mazya jamanyatil aajchi manne faqt changlya ani sunder goshtinkade aakarshit hotat ani risk ghyayla kachartat.. uff.. jara jastach vishleshan zale ka?
Maze mann ata mala lihinya pasun dur khechtay.. pudhe sarv vait asave bahuda...
Ugach risk nako.

Making Of "NARAHARI"


Well this is mi . As u all know i am an actor.. you all must have watched mi in Ya Sukhano Ya. do You know how i got in to this caracter NARAHARI...interesting Story..I was shooting at Kolhapur two years back for the film 'Amhi asu laadake' by Abhiram Bhadkamkar. On a very fine day i recieved a call from Virendra Pradhan (the original director whith whome i'd done Bhagyavidhata), he wanted mi to do another caracter which was developed at that point ( ie. Sampada kulkarni's husbond).I said yes but i was comitted my dates to abhiram so could not spare any for him..i wanted virendra to give mi 3,4 whatever dates at a stretch so as to adjust but he wanted all different dates to match with Vikram gokhle ji..for mi even at that point comittment was comittment...i said sorry..virendra got annoyed.."dont show your face to mi again" he said on the phone..
When i returned after a month from Kolhapur i went to the sets of Ya suhano ya & showed my face to virendra..he didnt utter a word ...i only said 'viru i know u r listning to mi ...i am back ' i went home from there..on the same night virendra called up & said come & see mi tomorro..will you be interested in a villain..Dream came true.
Next day we had a meeting..the get up was decided by him..the caracter was decided by him ..I added the typical Kolhapuri language in it..it was bit dicy but i was sure i could manage..
I did that caracter & then people loved it like any thing..I am amazed to see that people love the villain so much.
This is my first success on Television which gave me recognition.
I grab this opportunity to thank Virendra, Shilpa, Swatitai, Arinjay,ALL MY CO STARS & CREW of Rahul Productions.
Thank You for Reading mi.