वय साधारण १६ होते माझे तेव्हा .. गाडी , मोटार सायकल , फोन , रेल्वे चा प्रथम वर्गाचा प्रवास हे सगळे न परवडणारे होते तेव्हा .. फोन तर luxury या पंथात मोडला जाई .. ज्यांच्या घरी फोन होते ते जरा भाव खात .. आमच्या घरी काही तेव्हा फोन नव्हता .. पण त्या वाचून अडत हि नसे फार कधी . प्रस्तावना फार झाली आता मूळ मुद्द्यावर येतो .. STNL हा शब्द आठवला कि अजून हि फार हसतो मी .. बिल्डींग मध्ये तिसर्या मजल्यावर मी राहत असे आणि आमच्या वर गच्ची .. सकाळ संध्याकाळ तिथे जाणे होत असे .. एक दिवस पतंग उडवताना अचानक असे लक्षात आले कि आज आमच्या बिल्डींग वरून एक टेलिफोन ची वायर टाकली गेलीय .. तेव्हा खांबावरून फोन च्या वायर टाकल्या जात असत .. तर दूरच्या एका खांबावरून आलेली वायर आमच्या बिल्डींग च्या एका खिळ्याला वळसा घालून जवळच असलेया एका चाळीतल्या बंगाल्याच्या घरात गेलेली दिसली .. हा बंगाली हिरे व्यापारी होता .. आमचे लक्ष असायचे त्याच्यावर कारण त्याला दोन मुली होत्या .. काळ्या होत्या पण रेखीव होत्या ..जाता येता दिसायच्या .. असो मुख्य मुद्दा भरकटायला नको ... तर .. आमचा मित्र रुपेश ने असा शोध लावला कि त्या वायर ला आमच्या बिल्डींग वर एक joint आहे आणि टेप लावून तो बंद केला गेलाय MTNL कडून .. आधी आम्ही फार लक्ष दिले नाही पण रुपेश चे डोके त्याला स्वस्थ बसू देइना .. एकदिवस मी गच्चीत गेलो तेव्हा रुपेश तिथेच होता .. त्याने वायर खेचून घेतली होती गच्चीत , जमिनीवर बसला होता आणि joint पाहत होता .. हो समोरची बिल्डींग आमच्या पेक्षा उंच असल्याने काही खुफिया कामे करण्याकरिता खाली बसावे लागे नाहीतर समोरून सरळ सगळे दिसे.. मी हि उत्सुकतेने विचारले काय रे ? तो म्हणाला हे बघ हा joint सोडला तर आपल्याला फोन करता येतील पाहिजे तितके .. म्हणजे ? अरे लाइन सुरु असेल ना .. इथे एक फोन आणून लावला कि लगेच फोन सुरु .. आयला आणि त्या बंगाल्याचा फोन बंद होईल त्याचे काय? मरुदे ना .. आपल्याला काय करायचेय .. थोडा वेळ वापरू आणि पुन्हा joint करू .. फोन कुठून आणणार ..? मी बघतो .. रुपेश च्या या शोधावर मी तरी भलताच खुश झालो होतो .. दुसर्या दिवशी रुपेश त्याच्या मित्रा कडून एक छोटासा फोन घेवून आला .. लगेच दुपारी आम्ही गच्चीत पोहोचलो .. पण गच्चीत वाळवण आणि बिल्डींग मधल्या एक काकू तळ ठोकून बसल्या होत्या .. आयला खेप फुकट गेली ..आता या रोजच येणार इथे ..म्हणजे आपली गोची .. ठीक आहे आपण रात्री ७ वाजता येवू इथे मेणबत्ती घेवून असे ठरले .. त्या रात्री मी आणि रुपेश चुपचाप गच्चीत पोहोचलो .. वायर खेचून आत घेतली ..पण मेंबत्तीच पेटेना .. भन्नाट वारा असे गच्चीत .. जवळच पडलेल्या वाळवणा च्या टोपलीच्या आडोशाने मेणबत्ती पेटली अखेर .. वायर चा joint रुपेश ने झटक्यात सोडला .. आता वायर joint झाली फोन ला कि आमचा फोन सुरु .. मी फारच उत्साही होतो .. अगदी माझ्या घरीच फोन आल्यागत .. कारण खालचाच flat आमचा होता ना.. रुपेश ने दोन्ही वायर हाताने जोडल्या आणि लगेच आमच्या फोन मध्ये रिंग आली .. आम्ही दोघेही अपार खुश झालो आमच्या शोधावर.. उद्या भेटायचे ठरवून लगेच मेणबत्ती विझवली कारण समोरच्या बिल्डींग मध्ये समोरच रुपेश चा flat होता आणि त्याची आई समोर दिसत होती .. सत्संग भारती सोसायटी असे नाव होते आमच्या बिल्डींग चे .. या शोधा ला काहीतरी नाव द्यायचे म्हणून आम्ही त्याचे बरसे करून नाव ठेवले STNL .. सत्संग टेलिफोन निगम लिमिटेड . दुसर्या दिवशी आम्ही फोन च्या वायर ला दोन चिमटे जोडले जेणेकरून वायर धरून राहायला नको .. आमचे काहीतरी सुरु आहे याची कुणकुण आमच्या आई ला लागली आहे असे मला उगाचच एक दोनदा वाटून गेले .. रात्री पुन्हा आम्ही आमच्या जागेवर पोहोचलो .. टोपली खाली मेणबत्ती लावली .. वायर सोडली .. फोन चिमट्याने लावला .. फोन सुरु झाला आणि अचानक रिंग वाजली .. आम्ही घाबरलो .. आता उचलावा कि नाही .. उचलून बोलणार काय .. बंगाली .. आणि वाजत राहिला तर आजूबाजूला कळणार ..जाम घाबरलो दोघेही .. नेहेमीचे खेळणे नव्हते न आमचे ते .. फोन वाजायचा थांबला आणि आमच्या जीवात जीव आला .. रुपेश ने लगेच फोन उचलून माझ्या हातात दिला म्हणाला लाव कोणालाही फोन .. मी म्हटले कोणाला लावू ..कारण एकही नंबर माहित नव्हता कोणाचाच .. म्हणजे उद्या येताना एक दोघांचे नंबर मिळवायला हवेत असे ठरवून मेणबत्ती विझवली . तिसर्या दिवशी मात्र हि गोष्ट आणखीन एक दोन खास मित्रांना कळली होती .. त्या रात्री STNL मध्ये गर्दी जर जास्त झाली होती .. एक दोन फोन हि केले गेले .. सर्व फुकट झाल्याने आम्ही खुश होतो .. आणि अचानक फोन आला कुणाचातरी .. पुन्हा पळापळ झाली पण आमच्या एका अतरंगी ने फोन उचलून रॉंग नंबर असे सांगितले .. दोन तीनदा हा प्रकार घडला .. आता आम्ही जर धीट झालो होतो .. रुपेश ने येताना त्याच्या अमेरिकेत राहणाऱ्या मित्राचा नंबर आणला होता ..चल ट्रंक कॉल करूया असे म्हणून ट्रंक कॉल चा नंबर फिरवला .. trunk booking .. want to book a trunk call.. yes number please.. (XXXXX-XXXXXXXXXX) ok .. trunk is booked .. tell your numbar.. aa.. your number please aa... अरे आपला नंबर मागतेय तिला सांग होल्ड करतो .. madam I hold.. no no sir you have to give mi your number and once it gets connected you will receive a ring .. but madam ... hello madam... phone disconnect.. आयला trunk call बुकिंग कसे करतात हे माहितीच नव्हते .. चल आता मेणबत्ती विझावूया .. उदयाला त्या बंगाल्याचा फोन नंबर शोधून काढू .. असे म्हणून मी उठलो आणि माझ्या पायाखाली इतका वेळ दाबून ठेवलेले वायर चे दुसरे टोक गच्चीवरून खाली गेले .. आई शप्पत .. हा आता वेगळाच घोळ झाला .. हि वायर आता पुन्हा वर कशी आणायची .. आम्ही जाम घाबरलो .. वाटले आता पोलिस पकडणार येवून .. हे सगळे कमी कि काय म्हणून आमची आई गच्चीत आली आणि दरवाज्यातच उभी राहिली .. आम्ही सगळे जागीच उभे .. काय चाललाय ? इथे फोन चा आवाज कसा येतो ? ती टोपली अर्धी कशी जळली ? रोज तुम्ही गच्चीत का जमता ? आता वरून खाली रस्त्यावर फोन ची वायर पडली ती तूच टाकलीस ना ? ( मला थेट प्रश्न) थांब आज पप्पा येवुदेत .. माझ्या उत्साहाची मेणबत्ती तिथेच विझली होती .. कारण आमचे काहीतरी चालले होतेच , फोन चा आवाज आला होताच, टोपली जळली होतीच, रोज आम्ही गच्चीत जमत होतोच , शिवाय नुकतीच वरून जी वायर खाली गेली ती माझ्याच पायातून निसटली होती .. आई शप्पत उद्या पकडायला येणाऱ्या पोलिसांची जेव्हडी भीती नाही वाटली तेव्हडी आई ची वाटली .. मलाच नाही तर सर्वांनाच .. त्या तिथेच आमचे STNL बंद झाले. दुसर्या दिवशी बंगाल्याला आमच्या बिल्डींग खाली उभा राहून वर पाहताना मी पहिले आणि जम टरकलो .. म्हटले हा जातोय आता पोलिसात .. पण दुपारी पाहिले तर वायर पुन्हा जोडली गेली होती MTNL वाल्यांकडून आणि यावेळी ती आमच्या सोसायटी च्या बाहेरील झाडावरून गेली होती .. नंतर अनेक दिवस आम्ही तिच्या कडे पाहत असू .. आणि एकमेकांकडे पाहून हसत असू .. ( This is in remembrance of my friend Late Rupesh Khopkar )
Friday, January 4, 2013
किडे....

Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment