बगळा, कावळा , गोंद्या , सरडा ,चक्की, खोपडी अशी आमच्या शालेय गुरु जी
ना मुलांनी ठेवलेली काही टोपण नावे . त्यांची खरी नवे मी सांगणार नाही
कारण तो मित्रांशी केलेला द्रोह होईल …
बगळा : नेहमी सफेद कपडे घालत असत आणि इतिहास शिकवायचे … त्यांच्या तासाला मी दुसर्या मुलाच्या वहीतून पुढल्या तासाचा गृहपाठ कॉपी करताना त्यांनी मला पकडले आणि दोन्ही वह्या दुसर्या माळ्या वरून खाली ग्राउंड मध्ये फेकून दिल्या … त्या नंतर प्रिन्सिपल खोपडी कडून मिळवताना लई त्रास , शिक्षा झाल्या .
कावळा: नेहमी मुलींशी सलगी करायचे . आम्हाला त्याने खूप त्रास होई . एकदा त्यांच्या मागून मी त्याना कावळा या नावाने हाक मारलेली समोरून येणार्या खोपडी ने ऐकली आणि माझे काहीही न ऐकता मला शिक्षा. वर्गा बाहेर संपूर्ण दिवस . लाजच गेली .
गोंद्या : हा माणूस वेगवेगळे विषय शिकवत असे , गेल्या जन्मी हा नारद होता असा आमचा ठाम विश्वास होता . जाम लावालावी करायचा मुलांच्यात , त्यात त्यांना काय आसुरी आनंद मिळायचा हे त्यांचे त्यानाच माहित . त्यांचे खरे नाव या टोपण नावाशी साधर्म्य साधणारे होते . पिकनिक ला गेलो असताना 'गोंद्या आला रे' च्या आरोळ्या मी हि दिल्या होत्या. दुसऱ्या दिवशी नदी परिसर स्वछ करण्याची शिक्षा ठोठावली त्यांनी .
सरडा : अत्यंत समर्पक दिलेले नाव . रंग बदलण्यात हुशार . आंम्ही पोरे असलो तरी हुशार होतो . त्यांचे सगळे रंग ओळखून होतो . शारीरिक शिक्षण शिकवायचे . एकही व्यायाम त्यांना धड यायचा नाही . शाळेच्या ग्राउंड ला लागून असलेल्या चाळीच्या बाहेर लटकलेल्या आरशात मी माझ्या मागे उभ्या असलेल्या मुलीला पाहतोय हे त्यांच्या लक्षात आले आणि माझे प्रेमप्रकरण तिथेच संपवले त्यांनी मेंदीच्या फाका ने .
चक्की : हा फार इंटरेस्टींग माणूस होता . जगातला सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ आपणच असा समज होता त्यांचा . एका बाजूने पीठ टाकले कि दुसर्या बाजूने तयार गरम पोळ्या येतात असे मशीन त्यांनी शोधले आहे आणि ते त्यांच्या प्रयोगशाळेत आहे असे ते आम्हाला फेकायचे . आजवर त्यांचे हे संशोधन त्यांनी का लपवले आहे हे तेच जाणोत . त्यांच्या इंग्लिश च्या तासाला मी झोपलो तर त्यांनी मला डस्टर फेकून मारला. पण त्यांचा नेम चुकला आणि तो भलत्यालाच लागला . त्या चा बाप दुसर्या दिवशी शाळेत आणि मला दुसर्या दिवशी शिक्षा .
आता खोपडी : हे एक अजब रसायन होते . या ग्रहावरचे नव्हतेच ते . माझ्यावर जरा जास्तच 'प्रेम' . अनेकदा मला कळायचेच नाही कि आता मी काय केले असे कि यांचे 'प्रेम' उफाळून आले … सर्व गोष्टी साठी त्यांनी जागो जागी आपले जासूस पेरून ठेवले होते . आम्ही काहीही उचापती केल्या तरी त्या त्यांना आधीच काळत आणि मग धुलाई … शाळेच्या बाहेर BMC ने पाइप लाइन टाकायला चर खणला होता ,साधारण ३० फूट खोल , आतमध्ये उतरायला शिड्या लावल्या होत्या. कसा कोण जाणे आमचा बॉल त्यात गेला . मी जन्मत: च खूप शूर त्यामुळे मी आत उतरलो . संध्याकाळ असल्याने एक हि मजूर नव्हता . आत मध्ये वरून पहिले तर काळोख दिसायचा पण आत उतरल्यावर मला सर्व दिसत होते . सर्व इतर मुले मला वरून डायरेक्शन देत होती . मला बॉल सापडलाही पण वरून येणारा मुलांचा आवाज थांबला अचानक . मी खालून ओरडलो मिळाला रे मिळाला … वरून आवाज आला ' ये बाहेर ये , या मधल्या शिडीने ये , बॉल खिशात ठेव आणि शिडी निट पकडून ये…आवाज घुमत होता तरीही 'ये' या शब्दाला एक वेगळीच जरब जाणवली . मी वर पहिले तर खोपडी चा चेहेरा अंधारात मला शोधत होता . हातपाय खालीच कापू लागले होते. दोन्ही बाजूला मौत आत मध्ये राहिलो तरी काळोख पडू लागलेला आणि वर आलो तरी दैत्याच्या तोंडात . तरीही आलो कसाबसा . एकही मित्र आजूबाजूला नव्हता . खोपाडीने कॉलर पकडली आणि एक ठेवून दिली माझ्या कानाखाली … पुढे बरेच सुनावले पण मला ऐकूच आले नाही , काना ने काम करणे थांबवले होते. तसेच माझ्या घरी नेऊन त्यांनी मला आई च्या हातात सोपवले … मग पुढे काही सांगायला नको . असे आमचे अनेक प्रेमप्रसंग .
मध्यंतरी शाळेला ५० वर्षे झाल्याबद्दल एक कार्यक्रम होता . मला खास आमंत्रण होते . वरील काही सर भेटले . आता म्हातारे झालेलेल हे सर्व ' आम्हाला तुझा अभिमान आहे ' असे आवर्जून म्हणाले . त्यांच्या पायाला स्पर्श करून म्हणालो Thank you सर .

No comments:
Post a Comment